▶ खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश
▶ अहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील गावांना फायदा होणार
रमेश लिंबोरे
पैठण, (प्रतिनिधी) : पालखी ओटाच्या मागील बाजूस गोदावरी नदीवर जुने कावसनला जोडण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पुलास केंद्रीय मार्ग निधीतून केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती खा. संदिपान भुमरे यांनी दिली आहे.
पैठण हे प्राचीन ऐतिहासिक, धार्मिक, तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी दरवर्षी नाथ षष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सातशे दिंड्याच्या माध्यमातून जवळपास दहा लाख वारकरी भाविक व्यापारी पैठण नगरी मध्ये दाखल होतात. या सोहळ्याचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत चालले असून वारकरी भाविकांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. या दिंड्यांचे फड गोदावरी नदीच्या वाळवंटात लागत होते परंतु गोदावरीच्या नदीकाठी नाथ घाट बांधल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने फडासाठी जागा कमी पडत आहे.
-- यात्रा मैदानात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण --
त्यातच यात्रा मैदानात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पैठण शहरात यात्रेसाठी
जागा कमी पडत आहे यामुळे फडकरी जागा मिळेल तिथे आपले फड लावताना दिसत आहेत. जवळपास शहरात ही यात्रा पसरली आहे. यात्रे करुणा जागा कमी पडत असल्याची परिस्थिती लक्षात घेता खा. संदिपान भुमरे यांनी गोदावरी नदीवर जुने कावसनला जोडण्यासाठी गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आला तर जुने कावसन ते दक्षिण जायकवाडी परिसरात यात्रेसाठी पाणी सोडल्यास पूल पाण्याखाली जातो.
इतकेच नव्हे तर नाथसागर जलाशयातून ४० हजार क्यूसेक पाणी सोडल्यास नाथसागर जलाशय पायथ्याशी असलेला पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे कावसानच्या नागरिकांचा पैठण शहराशी संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांना पाटेगाव च्या पुलावरून वळण घालून येजा करावी लागते त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो किंव्हा आर्थिक देवाणघेवाण करून होडीने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यात्रेकरूंची व गोदावरी नदीकाठच्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खा. संदिपान भुमरे यांनी गोदावरी नदीवर पूल बांधण्यासाठी केंद्र शासनातून २५ कोटी रुपयाची मंजुरी मिळवली आहे.
या पुलाची लांबी ३०७ मीटर तर रुंदी बारा मीटर इतकी आहे. या फुलाच्या दोन्ही बाजूने १०० मीटर पोचमार्ग राहणार आहे. सदरील काम पाइल्स पद्धतीने करण्यात येणार आहे. या जागेची पाहणी कोकण भवनच्या टेक्निकल यंत्रणेने केली आहे.या पुलाचे काम के एच कन्ट्रक्शन मार्फत केले जाणार आहे. या कामास सुरुवात झाली असून सदरील पूल दोन वर्षात तयार होणार असल्याची शक्यता बांधकाम विभागाचे अभियंता तूपकरे यांनी दिली आहे.
मोठी जागा उपलब्ध होईल. या ठिकाणी वारकऱ्यांचे फड, सर्कस , तमाशे, रहाट पाळणे तसेच इतके इतर मनोरंजनाची साधने लावण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे या मुळे शहरातील गर्दी व वाहतुक कोंडी कमी होईल. तकेच नव्हे तर नाशिक, नगर, बीड जिल्ह्यातील वाहनांच्या पार्किंग साठी जागा उपलब्ध होणार आहे. तसेच सोनवडी, महमदपूर, घारी, कावसन, दक्षिण जायकवाडी, चनकवाडी येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. गोदावरी नदीत नाथसागर जलाशयातून पाणी सोडल्यास जुने कावसन येथील नागरिकांना तर तिन किमी अंतर पार करावे लागते.













